दातांच्या किडेवरील लस हा एक उपमा दिलेला शब्द प्रयोग आहे.
दातांच्या किडेवरील लस हा एक उपमा दिलेला शब्द प्रयोग आहे. कोणत्याही इन्फेक्टिव्ह आजारावर काही उपाय आणि काही उपचार असतात, ह्या सर्वांच ढोबळ मानाने आपण खालील प्रमाणे वर्गीकरण करू शकतो. १) Precautionary Measures २) Preventive Measures ३) Definative Preventive Measures ४) Treatment आता कोरोना व्हायरस च्या अनुषंगाने बघायचं झालं तर हात वारंवार धुणे, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टनसिंग पाळणे, सॅनिटायजर वापरणे हे झाले Precautionary Measures जे की सामान्य जनतेनी करायचे असतात ज्यांचा व्हायरस ला एक्सपोजर कमी असत. ह्या सोबतच N95 मास्कस वापरणे, फेस शिल्ड वापरणे, PPE किट वापरणे इत्यादी झाले Preventive Measures जे की कोरोना इन्फेक्टड रुग्णांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी करायचे असतात ज्यांचा की व्हायरस ला एक्सपोजर जास्त असत. ह्या दोन्हीही उपायाने इन्फेक्शन होणारच नाही आणि आजार वाढणारच नाही ह्याची शाश्वती नसते, पूर्ण खात्री नसते. त्या इन्फेक्शन वरील लस म्हणजे Definative Preventive Measures, ह्याने खात्रीपूर्वक आपण सांगू शकतो की आपणास इन्फेक्शन होणारच नाही (हे ढोबळ मानाने बोलणं झालं, शास्त्रीयरित्या बोलायच झा...