दातांच्या किडेवरील लस हा एक उपमा दिलेला शब्द प्रयोग आहे.
दातांच्या किडेवरील लस हा एक उपमा दिलेला शब्द प्रयोग आहे.
कोणत्याही इन्फेक्टिव्ह आजारावर काही उपाय आणि काही उपचार असतात, ह्या सर्वांच ढोबळ मानाने आपण खालील प्रमाणे वर्गीकरण करू शकतो.
१) Precautionary Measures
२) Preventive Measures
३) Definative Preventive Measures
४) Treatment
आता कोरोना व्हायरस च्या अनुषंगाने बघायचं झालं तर हात वारंवार धुणे, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टनसिंग पाळणे, सॅनिटायजर वापरणे हे झाले Precautionary Measures जे की सामान्य जनतेनी करायचे असतात ज्यांचा व्हायरस ला एक्सपोजर कमी असत. ह्या सोबतच N95 मास्कस वापरणे, फेस शिल्ड वापरणे, PPE किट वापरणे इत्यादी झाले Preventive Measures जे की कोरोना इन्फेक्टड रुग्णांसोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी करायचे असतात ज्यांचा की व्हायरस ला एक्सपोजर जास्त असत. ह्या दोन्हीही उपायाने इन्फेक्शन होणारच नाही आणि आजार वाढणारच नाही ह्याची शाश्वती नसते, पूर्ण खात्री नसते. त्या इन्फेक्शन वरील लस म्हणजे Definative Preventive Measures, ह्याने खात्रीपूर्वक आपण सांगू शकतो की आपणास इन्फेक्शन होणारच नाही (हे ढोबळ मानाने बोलणं झालं, शास्त्रीयरित्या बोलायच झालं तर इन्फेक्शन जरी झालं तरी सदरील आजार मोठा न होता लागलीच दाबल्या जातो शरीरात ऑलरेडी असलेल्या अँटी बॉडीज च्या साहाय्याने) आणि हे सर्वांकरिता असते. आणि उपचार ट्रीटमेंट म्हणजे अँटी व्हायरल ड्रग्स वैगरे.
लसी मध्ये काही प्रकार असतात जस की दर वर्षी घ्यायच्या (पोलिओ), दर तीन वर्षांनी घ्यायच्या (पूर्वीची HBV), अँटी बॉडीजच अस्तित्व तपासून घ्यायच्या (सध्याची HBV), जेंव्हा केंव्हा गरज पडेल तेंव्हा प्रत्येक वेळेस घ्यायची (TT), किंवा मग एकदाच घ्यायची (देवी रोग) इत्यादी.
अगदी ह्याप्रमाणेच दातांच्या किडेवरील उपायांच आणि उपचारच सुद्धा वर्गीकरण करता येत. व्यवस्थित ब्रश करणे, काही खाल्लं की चूळ भरणे, जास्त गोड आणि जास्त मऊ पदार्थ खाणे टाळणे इत्यादी हे झाले Precautionary Measures जे की ज्यांच्यात दातांना कीड लागण्याच प्रमाण कमी असत त्यांनी करायचे असतात. ह्यासोबतच मेडिकेटेड टूथ पेस्ट वापरणे, माऊथ वॉश वापरणे, डेंटल फ्लॉस वापरणे, रेग्युलर डेंटल चेक अप करणे हे झाले Preventive Measures जे की ज्यांच्यात दातांना कीड लागण्याच प्रमाण जास्त असत त्यांनी करायचे असतात. हे एवढं करूनही दातांना कीड लागणारच नाही अशी खात्री कुणालाही देता येत नाही. फ्लूओराईड जेल (APF Gel) किंवा व्हार्निश वापरणे, पिट अँड फिशर सीलेंट वापरणे इत्यादी झाले Definative Preventive Measures, जे की प्रत्येकाला वापरण्यात यायला पाहिजे आणि ह्याची आपण खात्री देऊ शकतो की कीड लागण्याच प्रमाण किती टक्क्याने कमी होईल ह्याची. सदरील जेल किंवा व्हार्निश दर सहा महिन्याला व्यक्तींना लावून घ्यावं लागतं म्हणजे त्याची परिणामकारकता वाढते. दातांच्या किडेच्या ट्रीटमेंट बद्दल सांगायचं झालं तर ह्यात दातात सिमेंट किंवा चांदी भरणे, दातांवर कॅप वैगरे बसवणे किंवा दातांचा नसेचा विलाज करणे (RCT) अश्या ट्रीटमेंट्स येतात.
दातांच्या किडेवरील लस असा काहीही शास्त्रीय शब्दप्रयोग नाहीय APF Gel (Fluoride Gel) साठी आणि लसीच्या शास्त्रीय व्याख्येत सुद्धा APF Gel बसत नाही ह्याची व्यवस्थित, स्पष्ट आणि पूर्ण कल्पना आहे आम्हास, परंतु इतर लसी प्रमाणेच हा एक Definative Preventive Measure आहे दातांच्या किडेवरील ह्यात काहीच शंका नाही, आणि ह्याकारणास्तव लसीची उपमा दिली आम्ही APF Gel ला अस म्हणायला काहीही हरकत नाही. हे आम्ही आमच्या अगदी सुरुवातीच्या लेखात स्पष्ट नमुद केलं होतं.
कवी आणि लेखक लोक अश्या उपमा नेहमीच देत असतात, उदाहरणार्थ "जसा काही डोंगराने हिरवा शालू पांघरला आहे", "अमुक तमुक नगरी सकाळच्या कोवळ्या उन्हाने न्हाऊन निघाली", इत्यादी. कुणीही सुज्ञ व्यक्ती ह्या अश्या उपम्या च्या लिखानाचा शब्दशः अर्थ कधीच घेत नाही. हो की नाही?
ग्लोबल डेंटल हॉस्पिटल, गुरुद्वारा चौक, नांदेड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा