दातांच्या किडेवरील लसेचा फोटो डेंटिस्ट मध्येच कमालीचा व्हायरल झाला त्याबद्दल.

दातांच्या किडेवरील लसेचा फोटो डेंटिस्ट मध्येच कमालीचा व्हायरल झाला त्याबद्दल.


मुळात व्हायरल काय व्हायला पाहिजे होत APF GEL , TOPICAL FLUORIDE APPLICATION, इत्यादी परंतु आपण व्हायरल काय केलं तर लस?


चला ह्या मुळे एक तर फायदा नक्कीच झाला की आपण एका बऱ्याच दुर्लक्षित आणि परिणामकारक प्रतिबंधात्मक उपचार पद्धती ची कधी नाही ते चर्चा करू लागलो.


APF GEL ची महती काय कुणी वेगळी सांगायला नको, आणि ज्यांना ह्याची थोरवी माहिती नाही त्यांनी नक्कीच माहिती करून घ्यावी.


APF GEL, FLUORIDE GEL, FLUORIDE VARNISH हे तितकेच परिणामकारक आहेत जेवढे ते आपण डेंटल प्रोफेशनल लोक दुर्लक्षित करत असतो.


पाश्चात्य प्रगत देशात तर शाळेत मुलांचे कंपल्सरी FLUORIDATION करण्यात येत, एवढी ह्याची महती.


सकाळपासून आपण ग्रुप मध्ये आपले काही सम्माननीय सीनियर डॉक्टर आणी सहकारी मित्रांनी खूप चर्चा केलीय. लस या शब्दाला अतिशय अवास्तव महत्व दिलं गेलय.  PG परीक्षेमध्ये जर हा प्रश्न आला असेल तर खरच ही ट्रीटमेंट महत्त्वाची आहे ना? जर असेल तर आपण ती का करू नये? आपल्या येथे लहान मुलांचे दातांचे डॉक्टर आहेत तर का तुम्ही आजपर्यंत flouride एप्लीकेशन केले नाहीत? केले असतील तर ते मोठ्या स्केल वर का केले नाही? मोठ्या स्केल वर केले असतील तर आपल्या पर्यंत अजून कसे काय पोहचले नाही? त्यांनी केला नाही म्हणुन जनरल डेंटिस्ट ने करू नये अस काही आहे का?


आपण एक ट्रीटमेंट मॉड्युल वाढवत आहोत. यात पेशंट सोबत चुकीच तर करत नाही आहोत. 

अगदी सुरुवातीलाच आम्ही आमच्या ब्लॉग वर आर्टिकल टाकला होता ह्याबाबत स्पष्टीकरणाचा.


लस या शब्दाला महत्व द्यायचा का उपचार पद्धति ला  हे प्रत्येकाने आप आपल्या कुवतीनुसार ठरवावे.

आणि जर कुणाला apf gel application चा demo या बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर बिलकुल संपर्क करा. यात फायदाच फायदा आहे.


आपल्या बऱ्याचश्या ट्रीटमेंट च रुग्णांना समजावं म्हणून आपण मराठीत किंवा हिंदीत भाषांतर करत असतो अस करताना तंतोतंत भाषांतर करण कधीच शक्य होत नाही आणि ते व्यवहार्य सुद्धा नसत जस, दातांच्या नसेचा विलाज किंवा दातांची नस कट करणे वैगरे, ह्यात आपण कधीच काहीच शंका घेत नाही आणि घ्यायला सुद्धा नाही पाहिजे.


आतापर्यंत APF GEL APPLICATION / TOPICAL FLUORIDE APPLICATION ह्या उपचार पद्धती आपण मराठीत भाषांतरित केलंच नाही कारण आपण ती रुग्णांना सांगतच नाही, आम्ही ते रुग्णांना सांगायला सुरुवात केली आणि अडाणी माणसाला समजेल अशा भाषेत भाषांतर केलं आम्ही.


- ग्लोबल डेंटल हॉस्पिटल, नांदेड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दातांना पिन बसवण्याची गरज का पडते? आणि अशी उपचार पद्धती माफक दरात करणे शक्य आहे का?