दात साफ केल्यावर दात ढिल्ले होतात का किंवा दातांना काही ईजा होते का?
प्रश्न - दात साफ केल्यावर दात ढिल्ले होतात का किंवा दातांना काही ईजा होते का?
उत्तर - नाही.
स्पष्टीकरण - दात साफ केल्यावर अस दात हलल्या सारख काही दिवस रुग्णांना जाणवत फक्त, दात ढिल्ले होत नसतात. दातांवर आणि दातांमध्ये घाण (Calculus) खूप जास्त जमलेली असेल तर त्या घाणेची रुग्णांना त्यांच्या जिभेला, हिरडीला आणि दातांना सवय झालेली असते. ही अशी सवय झाल्यामुळे ती घाण काढल्यावर काहिदीवस रुग्णांना त्याठिकाणी काहीतरी वेगळं जाणवत, दातांमध्ये गॅप जाणवतो आणि ह्याच रूपांतर रुग्णांना दात हलण्याप्रमाणे जाणवण ह्यात होत.
ही घाण काढणं खूप जरुरी असत, ह्या घाणी मुळे हिरडीला दाताला त्रासच होत असतो, परंतु हा त्रास रुग्णांना दुखत वैगरे काही नसतो. ह्या घाणी मुळे पुढे चालून हिरड्या कमकुवत होतात आणि दात हलायला लागतात, त्यामुळे वेळोवेळी ही घाण मशीन ने साफ करुण घेण जरुरी असत जेणेकरूनन दातांच आयुष्य वाढेल आणि हिरड्या निरोगी राहतील.
काही काही रुग्णांमध्ये दातांवर घाण (Calculus) खूप जास्त प्रमाणात जमलेली असते. अश्या रुग्णांच्या दातांच्या सपोर्ट ला असलेली हिरडी आणि जबड्याच हाड खूप जास्त झिजलेलं असत आणि ह्याठिकाणी ही घाण जमलेली असते. ह्या खूप जास्त जमलेल्या घाणी मुळे दात काही प्रमाणात एकमेकांना चिकटून बसलेले असतात आणि ते पक्के असल्याप्रमाणे रुग्णांना जाणवतात. ही घाण साफ केली की दातांच्या नेमक्या खऱ्या परिस्थितीनुसार दात थोडे हलायला लागतात. एकवेळ हे थोडस दातांच हलने परवडते परंतु हे एवढि जास्त घाण कधीही परवडत नाही. त्यामुळं अशी घाण साफ करून घेणं कधीही उत्तम.
दात साफ करण्यासाठी आम्ही Ultrasonic Scaler नावाची मशीन वापरत असतो. ह्या मशीनच मेटलच टोक खूप जास्त स्पीड ने व्हायब्रेट होत असत, ही स्पीड इतकी जास्त असते की ती डोळ्यांना दिसत सुद्धा नाही व्हायब्रेट होतांना. ह्या मशीन ने फक्त आणि फक्त दातांवर असणारी घाण (Calculus) आणि दातांवरील डाग (Stains) साफ होतात दातांना काहीही ईजा होत नाही, दात झिजत नाहीत किंवा दातांना क्रॅक्स वैगरे काहीहि पडत नाहीत.
सदरील मशीन बऱ्याच प्रयोगानंतर, खुपसाऱ्या अभ्यासानंतर आणि सखोल संशोधनानंतर आणि उत्तम प्रतीच्या कच्च्या मालापासून बनवलेली असते, व आम्हास डेंटिस्टस ना सुद्धा ह्याच शास्त्रशुद्ध आणि सविस्तर प्रशिक्षण दिले गेलेलं असत कशी आणि कुठे वापरायची ही मशीन ह्याबद्दल. आणि ह्याकरणास्तव सदरील मशीन ने दातांना आणि हिरडीला ईजा होणे जवळ जवळ अश्यकच.
ग्लोबल डेंटल हॉस्पिटल, नांदेड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा