डेंटल ट्रीटमेंट्स कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत करणे शक्य आहे का?

डेंटल ट्रीटमेंट्स कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत करणे शक्य आहे का?


हो शक्य आहे. डेंटल ट्रीटमेंट्स कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत करणे अगदी शक्य आहे. कस ते सांगतो पहा.

डेंटल ट्रीटमेंट्स चा जास्तीचा खर्च आणि जास्तीचा वेळ हा मुळात येतो तो रुग्णांच्या त्यांच्या दातांच्या आणि हिरडीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि ह्या बद्दलच्या अज्ञानामुळे.

दातांचे आणि हिरडी चे आजार हे अचानक एकदम क्वचितच येत असतात. जवळपास प्रत्येक आजारात काही अवस्था असतात जस की प्राथमिक अवस्था, मधली अवस्था, आणि शेवटची अवस्था. दातांचे आणि हिरडीचे आजार हे जर प्राथमिक अवस्थेत जर उपचार करून घेतले तर ते मधली आणि शेवटची अवस्था गाठतच नाहीत. ह्या पहिल्या अवस्थेतील आजाराच्या उपचारासाठी अर्थातच खर्च आणि वेळ खूप कमी लागत असतो आणि मधल्या आणि शेवटच्या अवस्थेतील आजाराच्या उपाचारासाठी खर्च आणि वेळ भरपूर लागत असतो.

रुग्ण दात दुखल्याशिवाय किंवा दात हलत असल्याशिवाय कधीही दवाखान्यात जात नाहीत आणि ह्या दोन्ही त्या त्या आजाराच्या शेवटच्या अवस्था आहेत.

दात दुखण्याची पहिली अवस्था ही दाताला छोटीशी अगदी कमी कीड लागण्याची असते जी की बिल्कुलही दुखत नसते पण रुग्णांनी जर आरशात त्यांचे दात काळजीपूर्वक बघितले तर त्यांना ते लक्षात येऊ शकत.

दात हलण्याची पहिली अवस्था म्हणजे हिरडीतून रक्त येणे किंवा हिरडी गुदगुद करणे. ह्यात रुग्णाला विशेष असा काही त्रास होत नसतो.

दातांच्या आणि हिरडीच्या आजाराच्या पहिल्या अवस्थेत रुग्णांना कसलाही त्रास होत नसतो किंवा खूप कमी आरामात सहन करण्याजोगा त्रास असतो त्यामुळे ते दवाखान्यात दाखवण्यास टाळाटाळ करत असतात.

ह्याकारणास्तव प्रत्येकाने दर सहा महिन्याला डेंटिस्ट कडून रुटीन चेक अप करून घेणं जरुरी आहे. काही काही आजारांच्या पहिल्या अवस्था रुग्णांना लक्षात येत नाहीत ज्या की आम्हा डेंटिस्टस ना लक्षात येऊ शकतात आणि मग त्यांचा वेळीच विलाज केला की कमी खर्चात आणि कमी वेळेत काम भागून जात.


ग्लोबल डेंटल हॉस्पिटल


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दातांना पिन बसवण्याची गरज का पडते? आणि अशी उपचार पद्धती माफक दरात करणे शक्य आहे का?