दात काढल्यावर डोळ्यांना धोका होतो किंवा नजर कमी होते.
दात काढल्यावर डोळ्यांना धोका होतो किंवा नजर कमी होते.
हा एक सर्वसामान्य गैरसमज आहे लोकांमध्ये. आम्हास दर दहा पैकी आठ जण हमखास हा प्रश्न विचारत असतात. अर्थातच हा फक्त गैरसमजच आहे, ह्यात तथ्य काहीच नाही. हा असा गैरसमज उद्भवण्यामागे हे एक कारण असू शकते की मानवाच्या उतार वयात पहिले दातं हलून पडायला लागतात आणि नंतर माणसाची दृष्टी कमी व्हायला लागते, ह्याकारणास्तव माणसांनी दात पडण्याचा आणि नजर कमी होण्याचा संबंध जोडला असेल. अजून एक कारण अस असू शकत की वरच्या जबड्याच्या दात काढत असताना जी काही स्थानिक भूल दिली जाते तिचा बधिरतेचा असर डोळ्यांच्या खालच्या पापण्यापर्यंत पोहचत असतो त्यामुळे पण लोकांनी दातांचा आणि डोळ्यांचा संबंध जोडला असेल. तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीय दातांचा आणि डोळ्यांचा.
आम्ही सतरा ते अठरा वर्षे वयाच्या मुला मुलींचे दात काढत असतो त्यांना दातांची पिन बसवल्यावर तेंव्हा त्यांच्या डोळ्यावर कसलाही परिणाम होत नाही.
बरेच जण ह्या भीतीपोटी दातांच्या दवाखान्यात येन टाळत असतात आणि त्यांची ट्रीटमेंट लांबवत असतात.
ग्लोबल डेंटल हॉस्पिटल.
Nice blog ,well written by Dr.jalba Dhumal sir
उत्तर द्याहटवा