दात साफ केल्यावर दात ढिल्ले होतात का किंवा दातांना काही ईजा होते का?
प्रश्न - दात साफ केल्यावर दात ढिल्ले होतात का किंवा दातांना काही ईजा होते का? उत्तर - नाही. स्पष्टीकरण - दात साफ केल्यावर अस दात हलल्या सारख काही दिवस रुग्णांना जाणवत फक्त, दात ढिल्ले होत नसतात. दातांवर आणि दातांमध्ये घाण (Calculus) खूप जास्त जमलेली असेल तर त्या घाणेची रुग्णांना त्यांच्या जिभेला, हिरडीला आणि दातांना सवय झालेली असते. ही अशी सवय झाल्यामुळे ती घाण काढल्यावर काहिदीवस रुग्णांना त्याठिकाणी काहीतरी वेगळं जाणवत, दातांमध्ये गॅप जाणवतो आणि ह्याच रूपांतर रुग्णांना दात हलण्याप्रमाणे जाणवण ह्यात होत. ही घाण काढणं खूप जरुरी असत, ह्या घाणी मुळे हिरडीला दाताला त्रासच होत असतो, परंतु हा त्रास रुग्णांना दुखत वैगरे काही नसतो. ह्या घाणी मुळे पुढे चालून हिरड्या कमकुवत होतात आणि दात हलायला लागतात, त्यामुळे वेळोवेळी ही घाण मशीन ने साफ करुण घेण जरुरी असत जेणेकरूनन दातांच आयुष्य वाढेल आणि हिरड्या निरोगी राहतील. काही काही रुग्णांमध्ये दातांवर घाण (Calculus) खूप जास्त प्रमाणात जमलेली असते. अश्या रुग्णांच्या दातांच्या सपोर्ट ला असलेली हिरडी आणि जबड्याच हाड खूप जास्त झिजलेलं असत आणि ह्याठिकाणी ...