एखाद्या रुग्णाला नवीन दात बसवत असताना दुसऱ्या माणसांचे किंवा दुसऱ्या प्राण्यांचे दात बसवतात का?
एखाद्या रुग्णाला नवीन दात बसवत असताना दुसऱ्या माणसांचे किंवा दुसऱ्या प्राण्यांचे दात बसवतात का? हा एक सामान्य प्रचलित गैरसमज आहे लोकांमध्ये. ह्यात तथ्य काहीच नाहीय हा एक फक्त गैरसमजच आहे. दात बसवण्यात मुख्य दोन प्रकार पडत असतात एक काढ घाल करण्याजोगे दात आणि दुसरा पक्का वाला दात. काढ घाल करण्याजोगे दातांना दातांची कवळी असे म्हणतात. ही शक्यतो वयस्कर व्यक्तींना बसवत असतात. हे Acrylic नावाच्या प्लास्टिक पासून बनवलेले असतात. दुसरा प्रकार म्हणजे पक्के दात . ह्यांना ब्रिज अस सुद्धा म्हणतात सामान्यतः. हे शक्यतो कमी वय असलेल्या तरुण व्यक्तींना बसवण्यात येतात. ह्यात दोन मुख्य प्रकार असतात त्यांच्या बसवण्याचा पद्धतीवरून. एक प्रकार असतो FPD नावाचा ह्याला ब्रिज अस म्हणतात. ब्रिज म्हणजे पडलेल्या दाताच्या आजूबाजूच्या दातांचा सपोर्ट घेऊन बसवण्यात आलेला दात. ह्यात मुख्य तीन प्रकार असतात त्यांच्या मटेरियल वरून. एक असतो मेटल चा (धातू चा), दुसरा असतो मेटल सिरॅमिक चा आणि तिसरा प्रकार असतो झिरकोनिया चा. सिरॅमिक म्हणजे आपली चिनी मातीची भांडी कप बश्या वैगरे असतात ना त्या टाइप मध्ये थोडं भारीच मटेरियल असत...